पुणे विद्यापीठाच्या अनेक यूजी, पीजी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

University Exam SPPU Result 2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule ) विविध अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांनी पुणे विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ unipune.ac.in वर जाऊन आपला निकाल पाहावा आणि डाऊनलोड करावा. सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटीने बीएससी (B.Sc), बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक, एमकॉम (MCom) आणि एमबीए (MBA) सह अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जारी करण्यात आले आहेत. निकाल तपासण्याची पद्धत आणि थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. कसा तपासावा SPPU Result 2021 - १: एसपीपीयूच्या अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर जा २: होमपेज वर, उपलब्ध निकालाच्या लिंक वर क्लिक करा ३: एक नवं पेज उघडेल, येथे अभ्यासक्रमाच्या लिंकवर क्लिक करावे ४: आवश्यक ती माहिती भरून लॉग-इन करून सबमिट बटणावर क्लिक करा ५: निकाल कॉम्प्युटर स्क्रीन वर उघडेल ६: कॉम्प्युटर की-बोर्डवर ctrl+f टाइप करा आणि आपला निकाल पाहा ७: हे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा काही अभ्यासक्रमांचे निकाल यापूर्वीच जाहीर यापूर्वी, पुणे विद्यापीठाने (SPPU) अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले होते. यात लॉ डिप्लोमा अभ्यासक्रमाचे निकाल, काही सर्टिफिकेट कोर्स आणि अन्य फायनल इयर आणि सेमिस्टर ऑक्टोबर २०२० मध्ये आयोजित परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hBLkXf
via IFTTT

Post a Comment

0 Comments