CBSE, ICSE परीक्षांचा केंद्राचा निर्णय दोन दिवसात; SC तील पुढील सुनावणी गुरुवारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ () आणि इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डांच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. केंद्र सरकारने या परीक्षांसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेऊन तो कोर्टापुढे ठेवण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी या याचिकेवर शुक्रवारी २८ मे रोजी सुनावणी होणार होती. मात्र विरोधी पक्षांना याचिकेची अॅडव्हान्स्ड कॉपी दिलेली नाही असं कोर्टाच्या लक्षात आल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने यावेळी अशीही टिप्पणी केली की १ जूनला केंद्र सरकार या परीक्षांबाबतच्या ठोस निर्णयाप्रत येणार असल्याचेही कळले आहे. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारने आपली भूमिका कोर्टापुढे ठेवली. येत्या दोन दिवसात बारावी परीक्षांसंदर्भातला निर्णय घेऊन तो कोर्टाला सांगू असे केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांनी सांगितले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी गुरुवारी ३ जून रोजी ठेवली आहे. 'परीक्षांबाबत निर्णय घेण्याचे काम तुमचेच आहे, तुम्ही निर्णय घ्या, हरकत नाही. पण गेल्या वर्षीच्या धोरणापेक्षा वेगळा निर्णय तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याचे समाधानकारक कारण द्यावे लागेल,' असेही न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला सूचित केले आहे. याचिकेत काय मागणी? सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत असं म्हटलं आहे की करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीत बारावीच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. परीक्षा विलंबाने घेतल्या तर निकालासही विलंब होणार, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर होणार. त्यामुळे परीक्षा रद्द कराव्यात आणि मूल्यांकनाची एक सामायिक पद्धत ठरवावी, जेणेकरून लवकरात लवकर निकाल लावता येतील, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांचे म्हणणे आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34uNrEA
via IFTTT

Post a Comment

0 Comments