Also visit www.atgnews.com
CBSE दहावी निकाल कधी आणि कसा लागणार; बोर्डाने केलं जाहीर
Result Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या परीक्षा नियंत्रकांनी जाहीर केले. याचबरोबर मे महिन्यात मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर २० जूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रलचलित धोरणांनुसार सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षा ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांची अंतर्गत मूल्यमापन या आधारे होते. यंदाही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन १०० गुणांच्या आधारे होणार आहे. विद्यार्थ्यांचे २० गुणांचे मूल्यांकन प्रचलित नियमांनुसार आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांच्या आधारे याचे गुणांकन करावे असे, मंडळाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी जाहीर केले. यासाठी मंडळाने वेगवेगळे निकष जाहीर केले आहेत. मंडळाने परीक्षा रद्द केल्याने ८० गुणांचे मूल्यांकन शाळांनीच करायचे आहे. हे मूल्यांकन शाळांनी वर्षभरात घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून करायचे आहे असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. हे सर्व मूल्यांकन पूर्ण करून सर्व माहिती ११ जूनपर्यंत मंडळाला सादर करण्यात यावे असे यात सांगण्यात आले आहे. हे मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन करायची आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असणार आहे. हे शिक्षक गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि दोन भाषा विषयांचे असावेत. दोन शिक्षक हे बाहेरिल शाळेचे असावे असेही यात सांगण्यात आले आहे. बाहेरील शाळांतील शिक्षकांना २५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी १५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या सर्वासाठीची सूत्रेही मंडळाने परिपत्रकात दिली आहेत. यामुळे निकालात समानता येणार आहे. समिती नियुक्तीपासून निकाल जाहीर करण्यापर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार २० जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. असे असेल ८० गुणांचे विभाजन चाचणी परीक्षा - १० गुण सहामाही परीक्षा - ३० गुण सराव परीक्षा - ४० गुण बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून ती कधी होणार हे १ जूनच्या बैठकीत ठरणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आला असून तो विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाइटवरून अपलोड करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33jwaOh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments