CBSE,ICSE बोर्डांच्या बारावी परीक्षांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

CBSE Class 12 Boards : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. केंद्रीय शिक्षण विभागासोबत यासंदर्भात बैठक झाली होती. यावेळी काही राज्यांनी परीक्षेला पाठिंबा दर्शविला तर काही राज्यांनी याला विरोध केला. ही परीक्षा रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांच्या गटाकडून केली जात आहे. यासाठी सोशल मीडियामध्ये मोहीम देखील राबविली जात आहे. बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेच्या बाजूने निकाल दिला तर तारखांची घोषणा उद्या १ जूनलाच होऊ शकते. दरम्यान, केंद्रीय शिक्षण विभागाने यापूर्वीच १ जूनपासून नवीन परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाचं लक्ष १ जूनला काय होणार, याकडे लागले आहे. विशेष म्हणजे या दरम्यान शिक्षण मंत्रालयाने परीक्षेशी संबंधित तयारीचा आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार २५ जुलैनंतर बारावी बोर्डाची परीक्षा घेतली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष आता बारावी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात कोणतीही घोषणा सर्वोच्च न्यायालयाची भूमिका पाहून नंतरच करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण विभाग या परीक्षेसंबंधीची तयारी करण्यात व्यस्त आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयासोबत उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली होती. मागच्या बैठकीत सीबीएसईने बारावी बोर्डाची परीक्षा १ जुलै ते २ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्याचा आणि सप्टेंबर महिन्यात परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परीक्षेची तारीख जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना किमान १५ दिवसांचा अवधी दिला जाईल असे सांगण्यात आले होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. पण न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p4OG6Q
via IFTTT

Post a Comment

0 Comments