Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका स्वत:च तयार करा! IIT Goa चा अनोखा प्रयोग
unique method of evaluatकरोना काळात सर्व विद्यार्थी शिक्षण संस्थेत प्रत्यक्षात येत नसताना त्यांचे मूल्यांकन कसे करायचे? हा महत्वाचा प्रश्न बनलाय. पण गोवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. गोवा आयाआयटीच्या अनोख्या पद्धतीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय. सध्या गोव्याच्या अॅनालॉग सर्किट प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट जोरदार व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांना शेवटच्या टर्म परीक्षेसाठी स्वतःच प्रश्न तयार करण्यास सांगितले गेल्याचे यामध्ये दिसून येते. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रश्न आणि त्याची दिलेली उत्तरे याआधारावर गुण दिले जाणार आहेत. आयआयटी गोवाने आपली प्रश्नपत्रिका दोन भागात विभागली. पहिला भाग हा 30 गुणांसाठी तर दुसरा भाग 40 गुणांसाठी होता. विद्यार्थ्यांना दिलेल्या शिकवणीच्या आधारे प्रश्न तयार केले जावेत, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पहिल्या भागात तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे यावरुन त्यांना किती अभ्यासक्रम समजला हे कळू शकणार आहे. विद्यार्थ्यांना २ तासात प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले. यासोबतच त्यांनी आपल्या मित्रांशी चर्चा करू नका अशा सूचनाही दिल्या गेल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्तरांमध्ये समानता आढळल्यास स्कोअर कमी केला जाईल. स्वतः तयार केलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, असे देखील सांगण्यात आले. या पद्धतीचं होतंय कौतुक आयटी गोव्याने अवलंबलेली ही पद्धत नाविन्यपूर्ण आणि अनोखी मानली जात आहे. त्यामुळे आयआयटी गोव्याच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या अनोख्या पध्दतीचे कौतुक सर्व स्तरातून कौतूक होतंय. परीक्षेची पारंपारिक पद्धत आणि ओपन बुक परीक्षेसोबतच आणखी एक पद्धत पुढे अवलंबली जाऊ शकते. ही प्रश्न पत्रिका सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी ही पद्धत वेगळी असल्याचे सांगितले. तर काहींनी याची खिल्ली देखील उडवली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ftQF1k
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments