PGCIL Recruitment 2021: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती

PGCIL 2021: (PGCIL) ने नोकरीच्या संधी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेश नागरी आणि विद्युत विभागात पदविका प्रशिक्षणार्थी म्हणून ३५ पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २४ मे २०२१ पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. कोणत्या विभागात किती पदे? डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) च्या ३० पदांसाठी आणि डिप्लोमा ट्रेनी (सिविल) च्या ५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती अधिकृत नोटीफिकेशनद्वारे देण्यात आली आहे. भरतीसाठी महत्वाची तारीख अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज २४ मे २०२१ पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२१ आहे. १५ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज शुल्क जमा करावे लागणार आहे. आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्जदारांचे कमाल वय २७ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. अर्ज शुल्क जनरल, ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी ३०० रुपये आहे. एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g9FD0D
via IFTTT

Post a Comment

0 Comments