Also visit www.atgnews.com
ITI Jobs 2021: आयटीआय पास उमेदवारांची भरती, परीक्षेविना मिळेल सरकारी नोकरी
BEL ITI Apprentice Vacancy 2021: तुम्ही देखील दहावीनंतर कोर्स (ITI Course)केला असाल तर सरकारी नोकरी तुमची वाट पाहतेय. आयटीआय असणाऱ्या उमेदवारांसाठी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांवर भरती (ITI )काढली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या विभागात भरती इलेक्ट्रॉनिक्स मॅक्यानिक फिटर इलेक्ट्रीशियन एनिस्ट टर्नर ड्राफ्ट्समेन मॅक्यानिक इलेक्ट्रो प्लेटर मॅक्यानिक रेफ्रिजरेशन आणि एयर कंडीशनिंग कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टेंट वेल्डर या पदांवर पगार दर महा १० हजार ३३३ रुपये असेल. हा बेसिक पे आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक भत्त्यांसह संपूर्ण पगार मिळेल. कोणत्या ट्रेडमध्ये किती पदांवर भरती निघाली ? याची माहिती सध्या देण्यात आली नाही. पात्रता या नोकरीसाठी उमेदवाराने १० वीनंतर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे. एनसीव्हीटी (NCVT)किंवा एससीव्हीटी (SCVT)मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय कोर्स करणे गरजेचे आहे. अर्जाची प्रक्रिया या नोकरीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करु शकता. पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला अर्जाचा फॉर्म दिसेल. तो डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढा. फॉर्म योग्यरितीने भरा. दहावी आणि आयटीआय मार्कशीट, सर्टिफिकेट्स आणि इतर सर्व महत्वाच्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवा. अर्जासाठी पत्ता डेप्यूटी मॅनेजर (HR/CLD), सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालाहल्ली पोस्ट, बंगळूरु - ५६००१३ या पत्त्यावर आपला अर्ज ३० जून २०२१ पूर्वी पाठवा. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड प्रक्रिया बीईएल आयटीआय अप्रेंटिसच्या पदांवरील नोकरीसाठी कोणतीही परीक्षा नाही. आपली निवड ही १० वी आणि आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SO1N00
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments