Also visit www.atgnews.com
NEET 2021: नीट परीक्षेची तारीखही बदलण्याची शक्यता
latest update: मेडिकल यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या नीट (NEET 2021) परीक्षेचे आयोजन १ ऑगस्ट २०२१ रोजी नियोजित आहे. मात्र करोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेता ही परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. रविवारी २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांसोबत देशातील कोविड स्थितीसंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी देशातील ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कोविड-१९ महामारीशी लढण्यासाठी मनुष्यबळ उपलब्धतेविषयी चर्चा झाली. या दरम्यान एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोविड ड्युटी लावण्याबाबत आणि नीट २०२१ च्या विषयावर देखील चर्चा झाली. एएनआय वृत्तसंस्थेने केंद्र सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत मेडिकल आणि नर्सिंग कोर्सेसमधून पास-आउट झालेल्या आणि अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड ड्यूटी लावण्यासंबंधी चर्चा झाली. जे विद्यार्थी आपली सेवा देतील त्यांना अतिरिक्त भत्ते देण्याचाही निर्णय झाला. केंद्र सरकारच्या सूत्रांचे असेही म्हणणे आहे की या बैठकीत नीट २०२१ परीक्षा स्थगित करण्याचाही निर्णय झाला असण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/336lhPw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments