मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाइन परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पुनर्परीक्षार्थींची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागीय केंद्राहून ऑनलाइन परीक्षेसाठी खबरदारी काय घ्यावी याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. करोना पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षाही लांबल्या. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. मुक्त विद्यापीठही परीक्षाही ऑनलाइन घेत आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत काही विषयांची परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही. त्यासह काहींनी परीक्षाच दिली नाही. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे संधी मिळाली आहे, विद्यापीठाच्या अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षा ऑनलाइन होणार आहे. औरंगाबाद विभागीय केंद्रातील चार जिल्ह्यातील १८० केंद्रावरील परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाच्या विविध ६५ पेक्षा अधिक अभ्यासक्रमांना ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देताना विद्यापीठाने विविध सूचना केल्या आहेत. आपला चेहरा वेबकॅमच्या समोर असावा, फोटो पडताळणीमध्ये चेहरा मॅच न झाल्यास परीक्षा देता येणार नाही. वेबकॅमद्वारा परीक्षा सुरू असताना वेळोवेळी फोटो काढले जातील, काही गैरप्रकार करीत नसल्याची सतत पडताळणी होत राहील. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांस परीक्षेतून बाद करण्यात येईल. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करू नयेत, अन्यथा परीक्षेतून बाद केले जाईल अशा सूचनांसह प्रणाली कशी असेल याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rf5yLo
via IFTTT

Post a Comment

0 Comments