Also visit www.atgnews.com
UPSC Jobs 2021: कंबाइंड मेडिकल सर्विस परीक्षा नोटिफिकेशन; बदलली ही तारीख
Notification: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ नोटिफिकेशनची माहिती दिली आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर सीएमएस एक्झाम २०२१ चे अपडेट जारी केले आहे. कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन पुढील आदेशानंतर जारी केले जाईल. केंद्र सरकारी भरती करणाऱ्या लोक सेवा आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन जारी होण्याची नवी तारीख लवकरच जारी करण्यात येईल. जे उमेदवार यूपीएससी सीएमएस परीक्षा २०२१ साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी आयोगाची वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. अर्ज upsconline.nic.in द्वारे केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ मधील सर्व ऑफलाइन परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SoW154
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments