AICTE Academic Calendar 2021: एआयसीटीईचे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी

Academic Calendar 2021:अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE)ने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर () जारी केले आहे. रिवाइज्ड कॅलेंडरनुसार, तंत्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२१ आहे. अॅकेडमिक कॅलेंडर एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर अपलोड केलं आहे. या कॅलेंडरनुसार, या बोर्ड द्वारे संस्थांना मान्यता देण्याची मुदत १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. दुसरीकडे मान्यता प्राप्त कॉलेजांमध्ये पहिली काऊन्सेलिंग प्रक्रिया ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत समाप्त होणार आहे. एआयसीटीई डाऊनलोड करण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. ११ ऑगस्टपर्यंत वाढली अॅडमिशनची मुदत एआयसीटीई शैक्षणिक कॅलेंडर 2021 नुसार, पीजीडीएम ()किंवा पीजीसीएम (PGCM)संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० जुलै पर्यंत होती. टेक्निकल कोर्सेसच्या पहिल्या वर्षाचे वर्ग सुरू करण्याची अखेरची मुदत १५ सप्टेंबर २०२१ आहे. टेक्निकल इन्स्टिट्युशनच्या महत्त्वाच्या तारखा मान्यता प्राप्त संस्थांची अखेरची मुदत ३० जून २०२१ विद्यापीठ किंवा बोर्डांद्वारे संस्थांना को मान्यता देण्याची अंतिम मुदत - १५ जुलै २०२१ फर्स्ट राउंड काऊन्सेलिंग किंवा सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत - ३१ ऑगस्ट २०२१ दुसऱ्या फेरीची अखेरची तारीख - ९ सप्टेंबर २०२१ फी रिफंडसह सीट कॅन्सेलेशनची अखेरची मुदत - १० सप्टेंबर २०२१ प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशनची अखेरची तारीख - १५ सप्टेंबर २०२१ द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशनची अखेरची तारीख - २० सप्टेंबर २०२१ PGDM/PGCM इन्स्टिट्यूशनसाठी महत्त्वाच्या तारखा पीजीडीएम / पीजीसीएम संस्थांसाठी मान्यता देण्याची अखेरची तारीख - ३० जून २०२१ वर्गांना सुरुवात - २ ऑगस्ट २०२१ प्रवेश रद्द करण्याची अखेरीची मुदत - ६ ऑगस्ट २०२१ प्रवेश प्रक्रियेची अखेरची तारीख - ११ ऑगस्ट २०२१ ऑनलाइन किंवा डिस्टन्स लर्निंग अभ्यासक्रमांच्या महत्त्वाच्या तारखा पहल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी ओपन आणि डिस्टन्स लर्निंग/ऑनलाइन लर्निंग मोडवर प्रवेशाची अंतिम मुदत अनुक्रमे १ सप्टेंबर २०२१ आणि १ फेब्रुवारी २०२२ आहे. तंत्र अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष इंजिनीयरिंग विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरु करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२१ आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gX0Db2
via IFTTT

Post a Comment

0 Comments