Also visit www.atgnews.com
'लसीकरणावेळी मोदीजी धन्यवाद! चे बॅनर लावा', महाविद्यालय,विद्यपीठांना UGCचे आदेश
देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील वयोगटाच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसींच्या तुटवड्यावरुन अनेक राज्यांनी तक्रारी केल्यानंतर केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. शाळा, विद्यापीठ, आयआयटी संस्थांमध्ये लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. या मुद्द्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण मोफत लसीकरणासाठी पंतप्रधानांचे आभार मानण्याचे बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना इंग्रजी आणि हिंदी बॅनर दिले आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने हे बॅनर बनवले आहेत. यामध्ये मोफत लसीकरणासाठी सरकारचे आभार मानणारा मजकूर आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात व्हॉट्सएपवर मेसेज पाठवण्यात आले. यूजीसी सचिव रजनीश जैन यांनी संस्थाना आपल्या इंटरनेट मीडिया पेजवर बॅनर लावण्यास सांगितले. तीन विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी हे निर्देश आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यूजीसी वेबसाइटवर असा बॅनर याआधी देखील लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो आहे. सर्वांसाठी लसीकरण मोफत असा मजकूर यामध्ये लिहिला आहे. तसेच हे जगातील सर्वात मोठे मोफत लसीकरण अभियानाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. यूजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत बोलणे टाळले तसेच शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी देखील यावर भाष्य करणे टाळले. पण महाविद्यालयातील बॅनरचा हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xDkrHl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments