शिक्षणमंत्री पोखरियाल AIIMS मध्ये दाखल, बारावी परीक्षांसदर्भात घेणार होते बैठक

Ramesh Pokhariyal admitted at AIIMS Hospital : केंद्रीय रमेश पोखरीयाल यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांचा करोनाची लक्षणे आढळल्याचे सांगण्यात येतंय. बारावी परीक्षांसंदर्भातील प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भातील सुनावणी गुरुवारी होणार आहे. दरम्यान शिक्षणमंत्री पोखरीयाल हे आज या संदर्भात महत्वाची बैठक घेणार होते. केंद्र सरकारने दोन दिवसांत निर्णय घेऊन तो न्यायालयासमोर गुरुवारी ठेवण्यात येणार आहे. देशातील विविध बोर्ड, शिक्षणसंस्था प्रतिनिधी यांच्याशी हे संवाद साधणार होते. दरम्यान करोनाची लक्षणे आढळल्याने ते एम्स रुग्णालयात भरती आहेत. मंगळवारी पोखरियाल यांची तब्येत बिघडली होती. AIMS मधील अधिकाऱ्यांनी ANI ला यासंदर्भात माहिती दिली. ६१ वर्षाच्या रमेश पोखरियाल यांना २१ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. करोनातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा कामात रुजू झाले होते. बारावी परीक्षेसंदर्भात आज निर्णय घेण्यात येणार होता. पण शिक्षणमंत्र्यांची तब्येत बिघडल्याने आज हा निर्णय कदाचित होऊ शकणार नाही. यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती नाहीय.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SLoguG
via IFTTT

Post a Comment

0 Comments