Also visit www.atgnews.com
प्रियंका गांधीचे शिक्षणमंत्र्यांना पत्र; CBSE बारावी परीक्षा न घेण्याचा पुनरुच्चार
CBSE Class 12 Board Exams: काँग्रेस पक्षाच्या महासचिव वद्रा यांनी सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांना पत्र लिहून करोना काळात बारावी बोर्ड परीक्षांचे आयोजन न करण्याची विनंती केली आहे. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या परिस्थितीत त्यांना ढकलणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. गांधी यांनी यापूर्वी देखील या परीक्षांच्या करोना काळातील आयोजनाबाबतच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात प्रियंका गांधी यांनी अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीकडे लक्ष वेधले आहे. या विद्यार्थी-पालकांनी आपल्याशी गेल्या काही दिवसांमध्ये संवाद साधल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. यासंबंधीची सर्व माहिती आणि पत्र गांधी यांनी ट्विट करत पोस्ट केले आहे. त्यांनी म्हटलंय, 'शिक्षणमंत्र्यांना मी सीबीएसई बारावीच्या परीक्षांसंबंधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून आलेल्या सूचनांसंबंधीची माहिती देत पत्र लिहिले आहे.' प्रियंका गांधी पुढे लिहितात, 'मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षांच्या आयोजनाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि विद्यार्थी, पालकांनी दिलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, असं मी पत्रात लिहिलं आहे.' विद्यार्थ्यांकडून केवळ बोर्ड परीक्षांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे क्रूरता आहे. गर्दीच्या परीक्षा केंद्रांवर मुलांना पाठवणे आणि त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणे अयोग्य आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. तज्ज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की करोनाची तिसरी लाट लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी अधिक धोकादायक होऊ शकते, याकडे प्रियंका यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. प्रियंका गांधी करोना महामारी काळात मुलांची बारावी बोर्ड परीक्षा घेण्याच्या मताच्या नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे किंवा घरून ओपन बुक टेस्ट घेण्यासारखे अनेक पर्याय सुचवले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SMRh9j
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments