Also visit www.atgnews.com
BECIL Recruitment 2021: १००हून अधिक पदांची भरती, ८वी पास असणाऱ्यांना संधी
BECIL : ८ वीं पास पासपासून पदवीधर असलेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट इंडियन लिमिटेड (BECLL)ने सुपवायझर, सिनिअर सुपरवायझर,अप्रेंडीस किंवा लोडर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बेसिलच्या अधिकृत वेबसाईटवर www.becil.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. भरती अंतर्गत एकूण १०३ रिक्त पद भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ आहे. अर्ज करण्याआधी नोटिफिकेशन वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. बेसिलमध्ये रिक्त पद (BECIL Vacancy 2021 Details) अप्रेंडीस किंवा लोडर - ७३ पद सुपरवायझर - २६ पद सिनियर सुपरवायझर - ४ पद एकूण रिक्त संख्या - १०३ पद अर्ज प्रक्रीया सुपरवाझर आणि सिनियर सुपरवायझर पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय बेसिक कॉम्प्यूटर माहिती असणे गरजेचे आहे. कार्गो इंडस्ट्रीमध्ये १ वर्षे सुपरवायझर पोस्टसाठी आणि २ वर्षे सिनियर सुपरवायझर पोस्टसाठी अनुभव असणे गरजेचे आहे. तर अप्रेंडिस किंवा लोडर पोस्टवर अर्ज करण्यासाठी उमेदवार ८ वी पास असणे गरजेचे आहे. तसेच लोकल भाषेसोबत हिंदी भाषा येणे गरजेचे आहे. पगार सीनियर सुपरवायझर-२०,३८४ रुपये सुपरवायझर- १८,५६४ रुपये अप्रेंडीस/ लोडर - १४,०१४ रुपये वयोमर्यादा सुपरवायझर पोस्टसाठी ३० वर्षे, सिनियर सुपरवायझरसाठी ३५ वर्षे आणि अप्रेंटीस किंवा लोडर पदासाठी ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा. कशी मिळेल नोकरी ? पात्र उमेदवारांची निवड नोकरी नोकरीच्या आवश्यकतेनुसार होणार आहे. नोकरीसाठी लेखी परीक्षा किंवा प्रत्यक्ष मुलाखत होईल. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी, महिला आणि माजी सैनिक ७५० रुपये (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी ५०० रुपये) एससी / एसटी, ईडब्ल्यूएस / पीएच - ४५० रुपये (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी ३०० रुपये)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sxwp6u
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments