Also visit www.atgnews.com
Goa HSSC Results 2021: बारावीची मूल्यांकन पद्धत जाहीर, ३१ जुलैला रिझल्टची घोषणा
Goa HSSC Results 2021: ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन( of Secondary and Higher Secondary EducationGBSHE) ने बारावी परीक्षांची मूल्यांकन पद्धत जाहीर केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन दहावी, अकरावी, बारावी अंतर्गत परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार गोवा बोर्ड बारावीचा रिझल्ट हा दहावी, अकरावीच्या अंकाचे वेटेज ३०-३० टक्के असेल. बारावीच्या गुणांचे वेटेज ४० टक्के असेल. यामध्ये दहावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या ३ विषयांची सरासरी असेल. अकरावीमध्ये थेअरी पेपरचे फायनल गुण दिले जाणार आहेत. याशिवाय बारावी यूनिट टेस्ट, एफटी, मिड टर्म आधारे गुण दिले जाणार आहेत. गोवा एचएसएससी निकाल २०२१ मूल्यांकन संदर्भात एक अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी मूल्यांकन पद्धतीवर खूष नसतील त्यांना करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२१ ला रिझल्टची घोषणा केली जाणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण अंतिम मानले जातील. गोवा बोर्ड १२ वी निकालाच्या अधिकृत माहितीसाठी वेबसाईट पाहू शकता. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. एप्रिलमध्ये कोरोना प्रादुर्भावात वाढत्या केसेसमुळे सीबीएसईसहित देशातील अनेक शिक्षण बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या. पण एप्रिल आणि मेमध्ये देखील परिस्थिती न सुधारल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटींगनंतर परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर अनेक राज्यांनी आपापल्या दहावीच्या आणि त्यानंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wY3YNZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments