Also visit www.atgnews.com
कसा तयार होणार दहावीचा निकाल... जाणून घ्या सविस्तर
Update: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाणार आहे, त्याबाबत मंडळाने विस्तृत माहिती दिली आहे. मंडळाने दहावीचे मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. मंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व शाळांनी वेळापत्रकाचे कसोशीने पालन करावे, असे जाणून घ्या कशी असेल दहावी बोर्ड निकालासाठी मार्किंग स्कीम... इयत्ता नववीत दोन घटक चाचणी आणि एक सत्र परीक्षा पूर्ण झाली होती. इयत्ता दहावीच्या विविध सराव परीक्षा ऑनलाइन पार पडल्या आहेत. या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेले गुण एका सूत्रात बांधून विद्यार्थ्यांना अंतिम गुणदान होणार आहे. याची कार्यप्रणाली बुधवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आली. यासाठी ‘ऑप्टिकल मार्क्स रीडिंग’ ही पद्धत वापरली जाणार आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा पातळीवर गुणांकन करण्याची जबाबदारी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकत्याच घेतलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत बहुतांश मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे सांगितले होते. शाळांकडून ‘ऑप्टिकल मार्क्स रीडिंग शीट’ भरून पाठविले जाणार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण राज्य माध्यमिक मंडळाकडे जातील. वेळापत्रकानुसार ११ ते २० जून या कालावधीत शिक्षकांना विषयनिहाय गुणतक्ते भरून शाळांचा निकाल समितीकडे सादर करावा लागणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन राहिले असेल, तर ते या कालावधीत केले जाणार आहे. यानंतर समिती शिक्षकांनी सादर केलेला निकालाचे नियमन करून प्रमाणित करणार आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या सॉफ्टवेअरमध्ये भरायचे आहेच. हे सर्व निकाल ३० जूनपर्यंत मंडळाकडे सादर करायचे आहे. ३ जुलैपासून राज्य मंडळस्तरावरील प्रक्रिया सुरू होणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gpNDKY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments