Also visit www.atgnews.com
IIT Kanpurचा नवा ट्रेनिंग कोर्स, देशभरात ऑक्सिजन प्लांटसाठी विशेषज्ञ तयार करणार
IIT Kanpur: कोरोना प्रादुर्भाव आणि भविष्यातील धोका पाहता देशभरात १० हजार नवे लावण्याची तयारी सुरु आहे. हे प्लांट चालवण्यासाठी देशभरात तिपट्ट कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. हे स्टाफ आयटी कानपुरच्या सहाय्याने तयार केले जात आहेत. संस्थेच्या विशेषज्ञांनी आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, कौशल्य विकास आमि उद्योग विकास मंत्रालयच्या सहयोगाने ७ दिवसांचा ऑनलाईन कोर्स बनविण्यात आला आहे. हा कोर्स मास्टर ट्रेनर्ससाठी आहे. जे स्वत:शिकून आपल्या राज्यांमध्ये ट्रेनर तयार करतील. पहिल्या बॅचचा कोर्स झाला आहे. हा कोर्स पुढेही सुरु राहणार आहे. याआधी आयटीआय, पॉलिटेक्निक, कौशल्य विकास केंद्राचे अधिकारी सहभागी झाले होते. काही दिवसांपुर्वीपीएम केअर फंड आणि संस्थेचे प्रा.अभय करंदीकर, मॅकेनिक इंजिनियरचे प्रा. समीर खांडेकर, प्रा. मलय दास यांच्यासहित इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी संस्थेकडून ऑक्सिजन प्लांट संचालन आणि सर्व्हिसिंगसाठी कोर्स तयार करण्यास सांगितले. यासाठी इथल्या विशषज्ञांनी सात दिवसांचा कोर्स तयार केला आहे. कोर्समध्ये प्लांटची देखरेख, समस्येचे निवारण, ऑपरेशन, फंडामेंटल सायन्ससहित इतर माहिती दिली जात आहे. पहिल्या बॅचमध्ये १०० जणांना प्रशिक्षण दिले गेल्याचे प्रा. समीर खांडेकर यांनी सांगितले. देशातील राज्य सरकारांना हा कोर्स करायचा आहे. संस्थेला अनेक राज्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन आले. त्यांना आपल्या इथे ट्रेनर्सना प्रशिक्षण द्यायचे आहे. देशातील नामवंत सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये विशेषज्ञांना हा कोर्स घ्यायचा आहे. संस्था बनवतेय ऑक्सिजन प्लांट संस्थेच्या इंक्यूबेटेड आठ कंपन्या स्वदेशी तंत्रज्ञानाने ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन जनरेटर बनवू इच्छित आहेत. याचे प्रोडक्शन लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये अनेक संस्था आणि जुने विद्यार्थी सहकार्य करणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jht4Di
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments