Also visit www.atgnews.com
राज्य सरकारचा मोठा निर्णय : ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ८२ वसतिगृह उभारणार
Good News for sugarcane workers childrens : राज्यातील ऊसतोड कामागारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane Workers) मुलांसाठी (Maharashtra Government) वसतीगृह उभारणार आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतीगृहास आज मंजुरी मिळाली. सामाजिक न्यायमंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर राज्यातील ४१ तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ८२ वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील परळी, केज, बीड, गेवराई, पाटोदा, माजलगाव, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड या दहा तालुक्यात वसतीगृह उभारण्यात येणार आहे. यामध्ये १०० मुलं-मुली राहतील अशी २० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. वसतिगृहांचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या इमारतींमध्ये हे वसतिगृह याच शैक्षणिक वर्षात सुरु राहणार आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय हीच त्यांना खरी श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uLCKIt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments