टॉप ५ भारतीय आयटी कंपन्यांमध्ये ९६ हजार नोकऱ्या देणार-नेस्कॉमचा दावा

IT Sector :भारतातील ५ आयटी कंपन्या ९६ हजार नोकऱ्या उपलब्ध करुन देतील असे नेस्कॉमच्या अहवालात म्हटले आहे. २०२२ पर्यंत आयटी क्षेत्रातील ३० लाख नोकऱ्या जातील असा अमेरिकन अहवाल प्रकाशित झाला होता. त्यानंतर हा खुलासा आला आहे. पण टॉप ५ भारतीय आयटी कंपन्यांमध्ये ९६ हजाराहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील असे सांगण्यात आले आहे. आयटी क्षेत्रात तंत्रज्ञानामध्ये वेगाने विकास झालाय. इथली नोकरी सर्वांना आकर्षित करते. त्यामुळे या क्षेत्रात काम आणि नव्या संधी येत राहतात असे आयटी क्षेत्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. वेगवेगळे उद्योग विशेष करुन खासगी सेक्टर्समध्ये ऑटोमेशनने वेग पकडल्याने १.६ कोटी जणाांना रोजगार देणाऱ्या देशातील सॉफ्टवेअर कंपन्यातून २०२२ पर्यंत ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे. यामुळे या कंपन्यांची १०० अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे. याचा अधिक भाग या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतात असे यात म्हटले होते. आयटी क्षेत्रातर्फे २०२१ सालात १३८००० स्किल्ड टॅलेंट घेतले असून आणखी भरती होईल असेही स्पष्ट करण्यात आले. इंडस्ट्रीतर्फे २ लाख ५० हजार कामगारांना डिजीटल कौशल्य दिले जातंय. आणि ४० हजार नवे डिजीटल गुणवत्ता असणारे कामगार कामावर ठेवत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांच्या कामाची क्षमता आणि गुंतवणूक वेगाने वाढण्यास मदत होते असे नेसकॉमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नॅसकॉमच्या मते, भारतातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (BPM) उद्योगात १.४ दशलक्षाहून अधिक लोक काम करत आहेत. बँक ऑफ अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये नऊ कोटीजण काम करत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा खोडून टाकण्यात आला आहे. मार्च २०२१ पर्यंत आयटी-बीपीएम क्षेत्रातील एकूण ४.५ दशलक्ष लोकांना रोजगार मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले. देशातील ५ टॉपच्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर हा अहवाल आधारित आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस एनएसई ०.५४%, व्हिप्रो NSEE १.५९ % , एचसीएल टेक्नॉलॉजीज NSE१.१३% आणि टेक महिंद्रा यांनी करोना काळात कामाचा वेग वाढवला. क्लाऊड कंप्यूटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आर्टिफिशन इंजेलिजन्स (एआय) आणि 5 जी यासारख्या क्षेत्रातील कौशल्य कामगारांची गरज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी नोकर भरतीत वाढ करण्याची योजना आखल्याचे अहवालात म्हटले आहे. https://ift.tt/35yk8S7


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zBubne
via IFTTT

Post a Comment

0 Comments