२०२२पर्यंत आयटी क्षेत्रातील ३०लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार,रिपोर्टमध्ये दावा

IT Sector Layoffs:वेगवेगळे उद्योग विशेषकरुन खासगी सेक्टर्समध्ये ऑटोमेशनने वेग पकडल्याने १.६ कोटी जणाांना रोजगार देणाऱ्या देशातील सॉफ्टवेअर कंपन्यातून २०२२ पर्यंत ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे. यामुळे या कंपन्यांची १०० अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे. याचा अधिक भाग या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतात. नेसकॉमच्या माहितीनुसार देशांतर्गत आयटी सेक्टरमुळे १.६ कोटी जणांना रोजगार मिळतो. यामधील ९० लाख जण कमी कौशल्य देणाऱ्या सेवा आणि बीपीओमध्ये काम करतात. बीपीओमध्ये २०२२ पर्यंत ३० टक्के जण आपली नोकरी गमावतील. यांची कामे रोबोट प्रोसेस ऑटोमेशन किंवा RPA च्या माध्यमातून होतील. इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्निझंट सारख्या कंपन्या आणि एतर कंपन्या देखील RPA अप-स्किलिंगमुळे ३० लाख जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताचा संसाधनांवर २५ हजार डॉलर खर्च करतो आणि अमेरिकेचा आपल्या संसाधनांवर साधारण ५० हजार डॉलर खर्च येतो. कपातीनंतर कंपन्यांचे पगार आणि कॉर्पोरेटशी संबंधित खर्चांचे साधारण १०० अब्ज डॉलर वाचणार आहेत. ऑटोमेशनचा वाईट परीणाम अमेरिकेवर देखील होणार आहे. तिथल्या १० लाख नोकऱ्या जाऊ शकतात असा अहवाल बॅंक ऑफ अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. भारत आणि चीन या देशांवर देखील याचा परिणम होणार आहे. तर जापान कमीतकमी जोखीममध्ये आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wzm7S2
via IFTTT

Post a Comment

0 Comments