पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशांना सुरुवात; निकालापूर्वीच अर्ज करण्याची मुभा

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : () अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रती अपलोड करणे, त्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी २६ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने () मंगळवारी जाहीर केले. दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्याकडे गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्जांमध्ये केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. उमेदवाराने राज्य मंडळाच्या २०२१ इयत्ता दहावी परीक्षेत प्राप्त केलेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या निकालाचा माहिती भरून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्याच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे. २३ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. तर कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये ई-स्क्रूटीनी, सर्व सुविधा केंद्रात येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया ३० दिवसांची असणार आहे. हेल्पलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी https://ift.tt/3wbNzEi या वेबसाइटवर भेट द्यावी. असे आहे वेळापत्रक - ऑनलाईन अर्ज भरणे ३० जून ते २३ जुलै - कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती - ३० जून ते २३ जुलै - तात्पुरती गुणवत्ता यादी - २६ जुलै - गुणवत्ता यादीवरील आक्षेप - २७ ते २९ जुलै - अंतिम गुणवत्ता यादी - ३१ जुलै हे लक्षात ठेवा - ई-अर्ज किंवा प्रत्यक्ष अर्ज पडताळणीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज प्रक्रिया आणि पात्रता पूर्ण केली नाही, तर विद्यार्थ्यांना कॅप प्रवेश प्रक्रियेत अर्ज करता येणार नाही. - राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध असलेले नॉल क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करावे. - राज्य मंडळातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आपला इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक भरावा. आसन क्रमांक नसेल तर तो शाळेकडून उपलब्ध होईल. त्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. - आसन क्रमांक टाकल्यानंतर या परीक्षेत प्राप्त गुण थेट मंडळाकडून घेऊन ते अपडेट केले जातील. - सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज पूर्ण करावे लागणार आहेत. - निकालात ग्रेड असेल तर समकक्ष गुणांमध्ये रुपांतर करून प्रमाणपत्र सादर करावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TraXjZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments