शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, मुंबई विद्यापीठातून लघु संशोधन प्रकल्पांस २ कोटी ९४ लाखांचे सहाय्य

small scale research projects: आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षकांच्या संशोधन वृत्तीला चालना आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. याचा शिक्षकांना खूप मोठा फायदा होणार आहे. शिक्षकांसाठी लघु संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य म्हणून मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण मंजूर निधीच्या ७० टक्के निधी दिला आहे. म्हणजेच लघु संशोधन प्रकल्पांना २ कोटी ९४ लाख ५४ हजार एवढा निधी या आठवड्यात वितरित केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठामार्फत शिक्षकांचे सादर करण्यासाठी ॲानलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विविध शाखांअंतर्गत शिक्षकांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकीएकूण ११७९ लघु संशोधन प्रकल्पांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मानव्यविद्या शाखेतील १७४, वाणिज्य २४५, विज्ञान ३९९ आणि अभियांत्रिकीसाठी ३६१ एवढ्या प्रकल्पांचा समावेश आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन संस्कृतीच्या वृद्धीसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधनवृत्तीला चालना मिळावी, संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापीठामार्फत दरवर्षी शिक्षकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याअंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विद्यापीठामार्फत शिक्षकांचे लघु संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी ॲानलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. विविध विद्याशाखांसाठी प्राप्त प्रस्तावांची समितीमार्फत छाननी करण्यात आली. त्यातील एकूण ११७९ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. या संबधीत शिक्षकांना चेकद्वारे निधी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zS4xe7
via IFTTT

Post a Comment

0 Comments