खुशखबर! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडागुण मिळणार

for and HSC Student : आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करोना प्रादुर्भावामुळे या दोन्ही परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार का याबबत प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे आता निरसन झाले आहे. दहावी आणि बारावीच्या स्पोर्ट कोटा असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत. यासाठी बोर्डाने शाळांना मुदतवाढ देखील दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक(दहावी)ची परीक्षा २९ एप्रिल रोजी तर उच्च माध्यमिक ()ची परीक्षा २० मे रोजी होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कोट्यातील गुण मिळणार का ? याबाबत पालकांमध्ये संभ्रम होता. दरम्यान हे गुण मिळणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. करोना काळात कोणत्या खेळाचे प्रकार झाले नव्हते. म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना हे गुण देताना ८वी, ९ वीचे क्रीडा प्राविण्य बघितले जाणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यापुर्वीचा ११ वीतील क्रीडा सहभाग पाहीला जाणार आहे. ही सवलत २०२०-२१ या परीक्षांसाठीच असणार आहे. तसेच क्रीडा प्रस्ताव पाठवण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांमार्फत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे १२ ते २१ जून दरम्यान प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव आणि यादी १५ जून ते २५ जून दरम्यान पाठवायची आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gfLEtW
via IFTTT

Post a Comment

0 Comments