शिक्षण विभागात ८५ टक्के पदे रिक्त; कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शाळांनी केलेल्या शुल्कवाढीबाबत याचबरोबर शाळांतील विविध गैरप्रकारांबाबत अनेक तक्रारी शिक्षक, पालक यांच्याकडून होत आहे. मात्र त्या सोडविण्यासाठी अधिकारीच नसल्याचे उघड झाले आहे. शिक्षण विभागात राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. तर मुंबईत तब्बल ८५ टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाची राज्यभरातील पदे तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक रिक्त आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कारभार चालणार कसा आणि प्रश्न निकाली लागणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील शैक्षणिक प्रशासनातील संचालक, उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी अशी राज्यभरात एकूण ८८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी या पदावर सद्यस्थितीत ३०० अधिकारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. तर तब्बल ५८५ पदे रिक्त आहेत. याशिवाय गटशिक्षणाधिकारी यांची ६६९ पदे आहेत. त्यापैकी केवळ २२७ पदे भरली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उप शिक्षणाधिकारी (वर्ग २) पदोन्नतीसाठी पात्र व्यक्तींच्या ३ वर्षांपासून शोध सुरू आहे. वारंवार मागणी करुनही हा शोध संपलेला नसल्याचे आयुक्त कार्यालय सांगते अशी माहिती पदांची भरती करावी या मागणीचा पाठपुरावा करत असलेल्या मुंबई राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. शिक्षण आयुक्तालय केवळ माहिती मागवते. मात्र पदेच भरली जात नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ हे पद पदोन्नतीसाठी पात्र असूनही हे पद भरण्यासाठी वेळ काढला जात आहे. मुंबईतही अजब कारभार सुरू आहे. पदे भरलेली नसल्याने पालकांचे प्रश्न सुटत नाहीत पालकांच्या शुल्कासंदर्भातील तक्रारी, शिक्षकांच्या तक्रारींवर निर्णय होत नाहीत आणि प्रश्न प्रलंबित राहण्याचे प्रमाण वर्षानुवर्ष वाढत आहे. मुंबईतील रिक्त पदे मुंबई पश्चिम विभागात १ शिक्षण निरीक्षक पद, ६ उपशिक्षण अधिकाऱ्यांपैकी ५ पदे, सहायक उपनिरीक्षकांच्या ८ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. उत्तर विभागात ६ उपशिक्षण निरीक्षक, ७ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. दक्षिण विभागात ४ उप शिक्षणाधिकारी, ३ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. एकूणच उपशिक्षणाधिकारी व सहायक उपशिक्षणाधिकारी यांची ३७ पदे मंजूर असली तरी तब्बल ३१ पदे रिक्त आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jhuC03
via IFTTT

Post a Comment

0 Comments