ICAI CA Exam: परीक्षा स्थगिती, केंद्र वाढवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

2021:सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आगामी CA परीक्षा २०२१ च्या उमेदवारांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामध्ये ऑप्ट-आऊट पर्याय, करोना प्रोटोकॉल पालन, अधिक परीक्षा केंद्र आणि यावर सुनावणी होणार आहे. ICAI ने जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय दिला आहे. जो उमेदवार किंवा त्याच्या घरचे करोना पॉझिटीव्ह असतील त्यांना हा पर्याय देण्यात आला आहे. अधिवक्ता अनुभा श्रीवास्तव सहाय्य यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एएम खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. अनिरुद्ध बोस यांचे बेंच २८ जूनला सकाळी १०.३० वाजता अनुभा श्रीवास्तव सहाय यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. संस्थेने ऑप्ट आऊटची घोषणा केली आहे. अधिक परीक्षा केंद्र आणि परीक्षा स्थगित करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्या. सहाय यांनी याचिकेमध्ये परीक्षाकेंद्र वाढवण्याची मागणी केली आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक परीक्षा केंद्र असायला हवे. परीक्षेचे आयोजन वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला हवे. जुन्या अभ्यासक्रमाअंतर्गत इंटरमीडीएट आणि अंतिम परीक्षेत बसणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षेत सहभागी असलेले उमेदवार आणि ड्यूटीवर असणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण अभियान राबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी करोना दिशानिर्देशांचे पालन करावे. जर विद्यार्थ्यांचे लसीकरण वेळेत झाले नाही तर ६ जुलैपासून निर्धारित परीक्षा स्थगित कराव्या असे याचिकेत म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h8hGHl
via IFTTT

Post a Comment

0 Comments