उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज ३० जूनपर्यंत

Higher Education : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपण्यास केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. ही मुदत ३० जूनला संपणार असून, यानंतर अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमार्फत तंत्रशिक्षण व योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइन पद्धतीने अंमलबजावणीसाठी विकसित करण्यात आलेले आहे. यामध्ये तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनाचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती अर्जासाठी व २०१९-२० मधील विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी जवळपास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. करोना प्रादुर्भाव लक्षात घेत ही मुदतवाढ देण्यात आलेली असली, तरी ३० जूननंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त भगवान वीर यांनी सांगितले. महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांनी जमा केलेले सर्व अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून समाजकल्याण विभागाकडे ३० जूनपर्यंत जमा करावे लागणार आहेत. अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांकरिता विविध योजनांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तीन डिसेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gWwQz8
via IFTTT

Post a Comment

0 Comments