NWDA Application 2021:राष्ट्रीय जल विकास प्राधिकरणात भरती,बारावी पास असणाऱ्यांना संधी

NWDA Application 2021: राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण(NWDA)मध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाने नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाअंतर्गत एनडब्ल्यूडीएने ६२ पदांसाठी भरतीची जाहीरात काढली आहे. १० मे रोजी यासंदर्भात जाहीरात देण्यात आली होती. देशभरात एलडीसी, यूडीसी, जूनियर इंजीनियर, स्टेनोग्राफर, ज्यूनियर अकाउंट्स ऑफिस आणि हिंदी ट्रांसलेटर पदांसाठी अर्ज मागवण्यात आली आहे. या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया २५ जून २०२१ रोजी संपत आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अजूनही अर्ज केला नाही ते अर्ज करु शकतात. एनडब्ल्यूयूडीए भरती २०२१ साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nwda.gov.in वर माहिती मिळेल. ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करु शकता. बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी ८४० रुपये तर एससी, एसटी, आर्थिक कमजोर, दिव्यांग, महिला उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागेल. हिंदी ट्रान्सलेटर (१ पद) - हिंदीतून एमए आणि बीए इंग्रजी आणि ट्रान्सलेशनमध्ये डिप्लोमा. वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष. अपर डिविजन क्लर्क (१२ पद) - पदवी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे लोवर डिविजन क्लर्क (२३ पद) - १२ वी पास आणि इंग्रजी ३५ वर्ड स्पीड प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टाइपिंग स्पीड. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. ज्यूनियर इंजिनियर (नागरी) (१६पद) - सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. स्टेनोग्राफर (५ पद) - बारावी पास आणि शॉर्टहँड्स मध्ये ८० शब्द प्रति मिनिट स्पीड. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. जूनियर अकाऊंट्स ऑफिस (५ पद) - बीकॉम आणि ३ वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SSPK26
via IFTTT

Post a Comment

0 Comments