केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द

12th std Board Exam Cancelled : बोर्डाची (CBSE Board 12th Std Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. देशात उद्भवलेल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परीक्षा रद्द झाल्यानंतर निश्चित मानकांच्या आधारे नियोजित वेळेत विद्यार्थ्यांचे मुल्यमापन केले जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असल्यास परिस्थितीत अनुकूल झाल्यावर त्यांना सीबीएसईकडून पर्याय मिळणार आहे. देशातील काही राज्ये प्रभावी मायक्रो-कंटेन्टमेंटद्वारे परिस्थिती हाताळत आहेत, तर काही राज्यांनी अजूनही लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत. त्यामुळे अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडता कामा नये असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आजच्या बैठकीत केंद्रीय गृह, संरक्षण, वित्त, वाणिज्य, माहिती व प्रसारण, पेट्रोलियम व महिला व बालविकास मंत्रालय आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागांचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
    पंतप्रधानांनी यापूर्वी २१ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती ज्यात मंत्री व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.ज्यामध्ये राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. बैठकीत सीबीएसई परीक्षा आयोजित करण्याच्या विविध पर्यायांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या अभिप्रायांवर चर्चा करण्यात आली होती. राज्यातल्या बारावीच्या परीक्षांचं काय? विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आपली कायम प्राथमिकता असायला हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यातल्या बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी, ' घरी रहा आणि काळजी घ्या,' असा सल्ला दिला आहे.


    from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pllCbD
    via IFTTT

    Post a Comment

    0 Comments