RBI Result 2021: भारतीय रिझर्व्ह बँक ग्रेड Bऑफिसर भरतीचा निकाल जाहीर

RBI Grade B Result 2021, Sarkari Result 2021 :रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने ग्रेड Grade B DR (DEPR/DSIM) मध्ये अधिकाऱ्यांच्या भरती परीक्षेच्या निकालाची घोषणा केली आहे. आरबीआय ग्रेड बी नोकरभरती २०२१ (RBI Grade B Recruitment 2021)ची परीक्षा देणारे उमेदवार आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in किंवा opportunities.rbi.org.in वर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकतात. आरबीआय ग्रेड बी अधिकारी भरती परीक्षा फेज -२, पेपर २ आणि ३ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. आरबीआय पेपर १ ची परीक्षा ६ मार्चला तर पेपर २ आणि ३ ची परीक्षा ३१ मार्चला केले होते. परीक्षा दिलेले उमेदवार रिझल्ट तपासण्यासाठी बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊ शकतात. आरबीआय ग्रेड बी फेज २ चा निकाल असा तपासा आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. होमपेज पर, 'Current Vacancies' मध्ये 'Results'टॅबवर क्लिक करा. कॉम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज तयार होईल. संबंधित लिंकवर क्लिक करा. तुमचा रिझल्ट खुला होईल. रिझल्ट तपासा आणि प्रिंटआउट कॉपी डाउनलोड करा. गुण आणि कट-ऑफ आरबीआय टप्पा २ परीक्षेचे गुण आणि कट ऑफ ऑफ निवड प्रक्रिया पूर्ण होऊन भरतीच्या अंतिम निकालाची घोषणा झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली जाईल. मुलाखत पत्र निवडल्या गेलेल्या उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवले जाईल. यामध्ये मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. उमेदवारांनी स्पॅम आणि जंक बॉक्ससह ईमेल तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर रद्द होऊ शकतो अर्ज निवड केल्या गेलेल्या उमेदवारांनी अद्यापही आपले महत्वाचे कागदपत्र जमा केले नाही आहेत. ११ जून २०२१ पर्यंत ते documentrbisb@rbi.org.in पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे. कोणत्या उमेदवाराने असे न केल्यास त्याला पुढे जाण्यास स्वारस्य नसल्याचे गृहीत धरण्यात येईल. भरती प्रक्रियेतून त्यांची नाव हटविली जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pgyL5x
via IFTTT

Post a Comment

0 Comments