लॉ, एमसीएच्या सीईटीची नोंदणी लवकरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे Update: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून () एमसीए, लॉ, बीएड, बीपीएड अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलकडून तयारी सुरू करण्य़ात आली आहे, अशी माहिती सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीईटी सेलने काही दिवसांपूर्वी इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, लॉ (तीन वर्षे), लॉ (पाच वर्षे), बीएड/ एमएड (इंटिग्रेटेड), बीए-बीएस्सी/ बीएड (इंटिग्रेटेड), बीपीएड, बीएड, एमएड अशा आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारणा करण्यात येत आहे. सीईटी सेलकडून राज्यातील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, येत्या आठवड्यात सर्व प्रकारच्या सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू करण्याचे नियोजन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. एमएचटी-सीईटी आणि एमबीए सीईटीसाठी नोंदणी सुरू झाल्यानंतर, विद्यार्थ्यांकडून नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत आहे. सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. हे नियोजन करण्यापूर्वी राज्यातील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील आठवड्यात सीईटी परीक्षांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. - चिंतामणी जोशी, आय़ुक्त, सीईटी सेल एमसीए, आर्किटेक्चरसाठीही नोंदणी सुरू होणार राज्यात एमबीए सीईटीच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या एमसीए, हॉटेल मॅनेजनेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम-एचएमसीटी), आर्किटेक्चर (एम-आर्क), अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या; तसेच हॉटेल मॅनेजनेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी-एचएमसीटी) या पदवी अभ्य़ासक्रमाच्या सीईटीला नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gUAhYB
via IFTTT

Post a Comment

0 Comments