Also visit www.atgnews.com
५ जुलैपासूनच सुरू होणार CA परीक्षा; ऑप्ट आऊटसाठी RTPCR ची आवश्यकता नाही
सर्वोच्च न्यायालयाने काही बदलांसह चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षांना हिरवा कंदिल दाखवला आहे. या परीक्षा येत्या सोमवारी ५ जुलैपासूनच नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. उमेदवारांना ऑप्ट-आऊटचा पर्याय दिला जावा, शिवाय ऑप्ट-आऊटसाठी त्यांना RTPCR चाचणीची आवश्यकता नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला () दिले. उमेदवारांसाठी सर्वसमावेशक ऑप्ट आऊट स्कीम देण्याचे निर्देश न्यायालयाने आयसीएआयला दिले आहेत. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश महेश्वरी आणि न्या. अनिरुद्द बोस यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान आयसीएआयने कोर्टाला सांगितले की ऑप्ट आऊटचा पर्याय वापरणाऱ्या उमेदवारांना एका नोंदणीकृत डॉक्टरद्वारे जारी केलेले आरोग्य प्रमाणपत्र जमा करावे लागेल, ज्यात असं म्हटलं असेल की त्या उमेदवाराला किंवा त्याच्या नातेवाइकांना कोविड-१९ संसर्ग झाल्याने त्या उमेदवाराला परीक्षा देण्यात अडचण उद्भवली आहे. त्याचवेळी कोर्टाने मात्र ऑप्ट आऊट पर्यायासाठी RT-PCR अहवाल देण्याची ICAI ची अट फेटाळून लावली. कोर्टाने म्हटले की , 'आम्ही हे स्पष्ट करतो की उमेदवारांना RT-PCR सर्टिफिकेट रिपोर्ट सादर करण्याची आवश्यकता नाही.' दुसरीकडे आयसीआयने असेही म्हटले होते की एकाच शहरात परीक्षा केंद्र बदलल्यास ऑप्ट-आऊट पर्याय दिला जाणार नाही. या नियमालाही कोर्टाने फेटाळले. परीक्षा केंद्राचा बदल एकाच शहरातील असला तरीही ऑप्ट आऊट पर्याय दिला जावा, असे कोर्टाने नमूद केले. ही याचिका कोर्टाने बुधवारी निकाली काढली. अंतिम आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे. त्यामुळे आता सीए फायनल परीक्षा ५ जुलै पासून सुरू होणार आहेत आणि १९ जुलै रोजी नियोजित वेळपत्रकानुसार संपणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. सीए इंटरमिडीएट परीक्षा ६ ते २० जुलै २०२१ या कालावधीत होणार आहेत. सीए फाऊंडेशन परीक्षा २४ जून रोजी होणार होत्या, मात्र त्या लांबणीवर टाकण्यात आल्या. या परीक्षा २४ जुलै पासून सुरू होणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dtZO8O
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments