CBSE 10th, 12th Result 2021:सीबीएसईकडून हेल्पडेस्क तयार, हेल्पलाइन नंबर जाहीर

CBSE 10th, :केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ( 12th Result 2021) तयार करण्यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला आहे. हेल्प डेस्कच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल काढताना शाळांची मदत केली जाणार आहे. २४ जून पासून सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत कामाच्या दिवासांमध्ये या हेल्प डेस्कची मदत घेतली जाऊ शकते. सीबीएसई हेल्पडेस्कचा वापर टॅब्युलेशन (tabulation policy)साठी केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही अडचणी याामार्फत सोडवल्या जाणार नाहीत. हेल्प डेस्क दहावी आणि बारावी दोघांसाठी टॅब्युलेशन पॉलिसी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी सांगितले. शाळांसाठी हेल्पलाइन नंबर सीबीएसई १०वी, १२वी क्लास टॅब्यूलेशन प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे फोनवर दिली जातील. यासाठी कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची गरज नाही. बोर्डाने शाळांसाठी ९३११२२६५८७, ९३११२२६५८९,९३११२२६५९० हे नंबर जाही केले आहेत. तसेच आयटी संदर्भातील प्रश्नांसाठी शाळांना ९३११२२६५९१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त, सीबीएसईने आपल्या शाळांना ई-मेलवर आपले प्रश्न पाठवण्यास सांगितले आहे. ईमेल पाठवताना आपल्या शाळेचा क्रमांक, शाळेचे नाव आणि शहराचे नाव लिहा. सोबत वाचायला आणि समजायला सोपा जाईल असा छोटा ईमेल असावा. तुमच्या समस्येबद्दल सोप्या भाषेत सांगा जेणेकरुन मदत करणे सोपे होईल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. निकालाची तारीख सीबीएसईने १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आणि निकालासाठी मूल्यांकन पद्धतीची घोषणा केली. बारावीचे निकाल ३१ जुलैपर्यंत आणि दहावीचे निकाल २० जुलैपर्यंत येतील असे बोर्डाने म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xKSbm8
via IFTTT

Post a Comment

0 Comments