CTET 2021 परीक्षेची तारीख, अॅडमिट कार्ड कधी? जाणून घ्या...

2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड () द्वारे आयोजित करण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती आहे. सीबीएसई सीटीईटी 2021 परीक्षेसंबंधीचे अपडेट लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्ड सीटीईटी 2021 च्या तारखांची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या तारखा बोर्ड जाहीर करण्याची शक्यता कमी आहे, मात्र अॅडमिट कार्ड आणि अन्य माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे. सीटीईटी 2021 पात्रता सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात. सीटीईटी 2021 अर्ज प्रक्रिया गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी देखील सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यानंतर उमेदवार लॉगइन करून CTET 2021 अॅप्लिकेशन सबमिट करू शकणार आहेत. सीटीईटी सर्टिफिकेटची वैधता केंद्र सरकारने पूर्वीची शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) वैधता संपुष्टात आणली आहे. ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. शिक्षण मंत्रालय (Education Ministry)ने जारी केलेल्या निर्देशानुसार २०११ पासून टीईटी (Teachers Eligibility Test)ची आयुष्यभराची वैधता असेल. म्हणजेच ज्या उमेदवारांनी २०११ मध्ये टीईटी पास केली त्यांचे टीईटी प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी वैध असणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना ९ जून २०२१ रोजी जारी करण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता (TET Certificate Validity)केवळ ७ वर्षांची होती. एखाद्याने २०११ साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे २०१८ पर्यंतच वैध रहायचे. सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्वाचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zr80Aa
via IFTTT

Post a Comment

0 Comments