Also visit www.atgnews.com
QS Rankings 2022:टॉप २०० संस्थांमध्ये येणाऱ्या IISC, IIt मुंबईला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
QS Rankings 2022:क्यूस विद्यापीठ रॅकिंग २०२२ आणि टॉप २०० च्या यादीत आयआयटी मुंबई, आयआयसी बंगळुरु आणि आयआयटी दिल्ली यांनी स्थान मिळवले. यानंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी या संस्थांचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. भारतातील अधिकतर विद्यालय आणि संस्था जगात उत्कृष्टता आणि तरुणांमध्ये बौद्धिक कौशल्याचा प्रयत्न करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. या रॅंकिंगच्या टॉप २०० संस्थामध्ये ३ भारतीय उच्च शिक्षण संस्था आहेत. आयआयटी मुंबई (१७७ वे स्थान), आयआटी दिल्ली (१८५ वे स्थान) आणि आयआयएससीं बंगळुरु (१८६ वे स्थान आणि जगातील टॉपची रिसर्च युनिव्हर्सिटी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. जगातील २०० शीर्ष संस्थांमध्ये इतर कोणत्याही भारतीय संस्थानी २०१७ पासून जागा बनवली नव्हती. जागतिक रँकिंगच्या टॉप १००० मध्ये भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या एकूण संख्येत यावर्षी देखील कोणता बदल झाला नाही. २०१८ च्या रॅंकिंगमध्ये एकूण २० भारतीय संस्था होत्या. २०१९ मध्ये २४, वर्ष २०२० मध्ये २३ आणि २०२१ या वर्षात २१ भारतीय संस्थांनी जागा बनवली. २०२२ साठी २२ भारतीय संस्थाना स्थान मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. "आईएसएसबी बंगळुरु जगात पहिल्या स्थानावर आहे. क्यूस जागतिक विद्यापीठ रॅंकिंमध्ये १८ व्या स्थानी आहे. या महान कार्याबद्दल शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. राष्ट्रीय शिक्षण नीती (NEP) 2020 आणि इंस्टिट्यूट ऑफ एमिनंस (IoE) ही केंद्र सरकारने उचललेल्या महत्वाच्या पावलांपैकी एक आहे. यामुळे संस्थांना जागतिक ओळख मिळण्यास मदत मिळाल्याचे पोखरियाल म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tl17jm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments