GATE 2021: काऊन्सेलिंगच्या तिसऱ्या फेरीची अलॉटमेंट यादी जाहीर

GATE 2021: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंगच्या (Graduate Aptitude Test in Engineering, ) तिसऱ्या फेरीची सीट अलॉटमेंट लिस्ट जारी झाली आहे. जे उमेदवार तिसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगसाठी उपस्थित होते, ते कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टल वर यादी पाहू शकतात. यासाठी त्यांना आवश्यक ती माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त उमेदवार पुढे दिलेल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने देखील ही यादी पाहू शकतात. हा काऊन्सेलिंग प्रक्रिया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) द्वारे राबवली जात आहे. GATE 2021: राउंड ३ सीट अलॉटमेंट लिस्ट अशी तपासा - - राउंड 3 सीट अलॉटमेंट लिस्ट पाहण्यासाठी उमेदवारांनी कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट .iitd.ac.in वर जावे. - यानंतर लॉग इन टॅब वर क्लिक करून यूजर आयडी आणि पासवर्ड द्यावा. - यानंतर एकदा लॉग इन केल्यावर तुम्हाला अर्ज केलेल्या प्रत्येक संस्थेची स्थिती दिसेल. - यानंतर उमेदवारांकडे "अॅक्सेप्ट अँड फ्रिझ", "रिटेन अँड वेट", "रिजेक्ट अँड वेट" असे पर्याय असतील. - यानंतर GATE 2021 राउंड ३ सीट अलॉटमेंट यादीची स्थिती पहाात - प्रिंटआउट घेऊन भविष्यातील संदर्भाकरिता सांभाळून ठेवा. 2021 राउंड 3 सीट अलॉटमेंट यादीच्या आपल्या स्थितीबाबत समाधानी असलेले विद्यार्थी १३ जून २०२१ पर्यंत आपला प्रवेश कन्फर्म करू शकतील. या अंतिम मुदतीआधी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. GATE 2021 राउंड ३ काऊन्सेलिंगमधील प्रवेश स्वीकारणारे विद्यार्थी संबंधित संस्थेच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतील. यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xk09SP
via IFTTT

Post a Comment

0 Comments