Govt Jobs after 12th:बारावीनंतर सरकारी नोकरी हवी? या ५ परीक्षांची करा तयारी

after 12th:बहुतांश विद्यार्थी असे फिल्ड निवडतात ज्यामुळे लवकर मिळू शकेल. बारावीनंतर सरकारी नोकरी करण्यासाठी विद्यार्थी आधीच तयारी करतात. यासाठी अशा टॉप सरकारी नोकरीबद्दल जाणून घ्या ज्या बारावीनंतर मिळतात. तुम्ही पास आहात आणि नोकरीबद्दल विचार करताय तर आतापासूनच परीक्षेची तयारी सुरु करा. यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, राज्य पोलीस, भारतीय सैन्य आणि भारतीय वायु सेना (Data Entry Operator, State Police, Indian Army and Indian Air Force)अशा नोकऱ्यांचा समावेश आहे. एसएससी कंम्बाइंड हायर सेकंडरी लेवलCHSL) स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)आणि विविध पदांच्या भरतीसाठी एक कम्बाइंड हायर सेकेंडरी लेवल (CHSL)परीक्षेचे आयोजन केले जाते. याअंतर्गत डेटा इंट्री ऑपरेटर (DEO), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)/ ज्यूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA), पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट (PA/SA), कोर्ट क्लर्क अशा अनेक पोस्ट आहेत. सरकारी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षांचे नियोजन दहावी पास स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत केले जाते. यासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे इतकी आहे. तसेच २० हजारापासून ३४ हजारापर्यंत पगार मिळू शकतो. राज्य पोलीस (State Police) बारावीनंतर राज्य पोलील दलात नोकरी करण्याची संधी मिळते. कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर आणि आरक्षित सशस्त्र पोलीस दलातील पदांसाठी भरती केली जाते.दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार २० हजार रुपयांपर्यंत असतो. भारतीय संरक्षण दल(Indian Defense) भारतीय सैन्य, भारतीय वायु सेना आणि भारतीय नौदल(Indian Army, Indian Air Force and Indian Navy) या तीनही देशाच्या सुरक्षेचा विंग आहेत. १०+ २ नंतर भारतीय सैन्यात सहभागी होऊ शकता. भारतीय नौदल आणि वायुसेनेत १०+ २ स्तरावर फिजिक्स आणि मॅथ्सची आवश्यकता असते. नौदलाअंतर्गत कॅडेड, एसएसआर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल, यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षेच्या माध्यमातून भरती होते. २० हजारापासून ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. रेल्वे भरती बोर्ड (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) रेल्वे भरती बोर्ड (RRB)भारतीय रेल्वेमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी अनेक जागा रिक्त आहेत. सहायक लोको पायलट, कार्यालय सहायक, स्टेशन मास्टर आणि तिकिट कलेक्टर अशा पोस्ट असतात. यावर अर्ज करण्यासाठी १०+ २ असणे आवश्यक आहे. यामध्ये ४० ते ५० हजारपर्यंत पगार मिळतो. लेखी परीक्षेत पहिली प्री आणि मग मुख्य परीक्षा असते. अनेक सरकारी सुविधा मिळतात. लोको पायलट, टेक्निशियन पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असणे गरजेचे असते. एसईआर भरती अंतर्गत सहा तिकीट क्लार्क, टायपिस्टसाठी ५ हजार २०० ते २० हजार पर्यंत पगार असतो. चालक, पर्यवेक्षक १२ वी पासनंतर वेगवेगळ्या राज्यांमधील पर्यवेक्षक, पटवारी, चालक (Supervisor, Patwari, Driver)अशा भरती असतात. डब्ल्यूसीडी महाराष्ट्र भरती सुपरवायझरसाठी १८ ते ४५ वयोमर्यादा असून पगार ५ हजार ते २० हजार पर्यंत मिळतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qtys83
via IFTTT

Post a Comment

0 Comments