Hotel Managementमध्ये करिअरसाठी कॉलेज, प्रवेश, पगार सर्वकाही जाणून घ्या!

Career In :आपल्या देशातील पर्यटन आणि आथिथ्य क्षेत्र निरंतर वाढत आहे आणि त्याबरोबरच हॉटेल उद्योगाच्या विकासाची मागणीही वाढत आहे. भारत एक लोकप्रिय ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. त्यामुळे हे क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक विस्तारले आहे. विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर म्हणून निवडू शकतात. याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसच्या विविध भाग सेल्स आणि मार्केटिंग, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, फूड प्रोडक्शन, हाऊसकीपिंग आणि अनेक किच स्किल्स शिकता येतात. भारतातील अनेक सरकारी कॉलेज आणि खासगी कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करतो. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For Hotel Management) हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स निवडण्यासाठी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून १० + २ उतीर्ण असणे आवश्यक आहे. हॉटेल मॅनजमेंटच्या कोणत्याही कोर्ससाठी तुम्ही बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करु शकता. मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी मिळणं गरजेचं आहे. असा करा अर्ज (How To Apply In HM Colleges) हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा फॉर्म भरुन किंवा राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा देऊन अर्ज करु शकता. प्रवेश परीक्षा नॅशनल लेवल एंट्रन्स एनसीएचएम जेई एआयएमए यूजीएटी AIMA UGAT स्टेट लेवल एंट्रन्स युपीएसई बीएचएमसीटी (उत्तर प्रदेश) एमएएच सीटी एचएम (महाराष्ट्र) डब्ल्यूबीजेई एचएम (पश्चिम बंगाल) युनिवर्सिटी लेवल एंट्रन्स पीयूटी (पंजाब विद्यापीठ) सीयूटी (क्रेइस्ट युनिवर्सिटी) आयपीयू सीटी (गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ) कॉलेज आणि विद्यापीठ (Top Universities Of Hotel Management) इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन्स, पूसा आयएचएम मुंबई वेलकमग्रुप ग्रेज्यूएट स्कूल ऑफ हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मणिपाल आयएचएम हैदराबाद एआयएचएमसीटी, बंगळुरु बनारसदास चांदीवाला इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी, दिल्ली दिल्ली इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली करिअर (Jobs After Hotel Management) एकदा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली तर तुम्हाला नोकरीसाठी अनेक पर्याय आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, सिक्युरिटी सारखे अनेक विभाग आहेत. यासाठी तुमच्या आवडीचा विभाग निवडा आणि यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wWMW2M
via IFTTT

Post a Comment

0 Comments