HSL Recruitment 2021:हिंदुस्तान शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती

HSL Recruitment 2021: सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या शिपबिल्डिंग आणि शिप यार्ड रिपेयर काम करणारी सार्वजनिक क्षेत्र कंपनी हिन्दुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL)मध्ये पदांची निघाली आहे. नियमित आणि विशिष्ट कालावधीसाठी अशा एकूण ५३ जागा भरल्या जाणार आहेत. कंपनीने आापली अधिकृत वेबसाइट hslvizag.in वर यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे.कन्सल्टंट, मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एचएसएलच्या वेबसाइटच्या करिअर सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज भरु शकतात. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २३ जून २०२१ पासून सुरु होईल. २० जुलैपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच विशिष्ट कालावधीच्या भरतीसाठी उमेदवारांना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागेल. कन्सल्टंट पदांसाठी उमेदवार ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. नियमित पदांसाठी भरती जनरल मॅनेजर (एचआर) - १ पद अतिरिक्त जनरल मॅनेजर (एचआर) - १ पद डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) - २ पद डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) - १ पद सिनियर मॅनेजर (टेक्निकल) - ४ पद मॅनेजर (टेक्निकल) - ७ पद मॅनेजर (फायनान्स) - १ पद विशिष्ट कालावधीसाठी भरती डेप्युटी मॅनेजर (फायनेन्स) - १ पद डेप्युटी चीफ प्रोजेक्ट ऑफिस (इंफ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन) - १ पद डेप्युटीचीफ प्रोजेक्ट ऑफिस (एसएपी बेसिस कंसल्टेंट विद एचएनए) - १ पद डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर (शिपविलराइट ट्रेड) - ६ पदवी डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर (सबमरीन टेक्निकल) - १४ पदवी डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर (आयएन शिप्स टेक्निकल) - ८ पद कंसल्टेंट विशिष्ट कालावधीसाठी भरती सिनिअर कन्सल्टेंट (टेक्निकल) - मुंबई - १ पद सिनिअर कंसल्टेंट (इंफ्रस्ट्रक्चर ऑगमेंटेशन) - १ पद सिनिअर कंसल्टेंट (इकेएम प्लानिंग अँड सबमेरिन प्रोजेक्ट मॅनेजमेंट) - १ पद कंसल्टेंट (इकेएम प्लानिंग अँड सबमरीन प्रोजेक्ट मॅनेजमेंट) - १ पद


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Uys7fT
via IFTTT

Post a Comment

0 Comments