Also visit www.atgnews.com
ICSE 12th Exam 2021: CBSE नंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षाही रद्द
12th board exam 2021: बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आल्यानंतर अनेक महिने चर्चा सुरु असलेल्या प्रश्नावर तोडगा निघाला. आता बोर्ड परीक्षा घेणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आयसीएसई बोर्डाने देखील आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांची द्वीधा मनस्थितीतून सुटका केली आहे. आयसीएसई बोर्डाने (ICSE Board)देखील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काउंसिल फॉर द इंडीयन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (सीआयएससीई) चे अधिकृत संकेतस्थळ cisce.org वर आयएससी परीक्षा रद्द ((ISC Exam 2021)होण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांच्या आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे या नोटिसमध्ये आयएससीने सांगितले. कसा बनेल रिझल्ट ? परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि रिझल्ट कसा तयार होणार हा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, रिझल्ट बनवण्यासाठी आयसीएसईने एक यंत्रणा तयार केली आहे. शाळेत झालेल्या परिक्षांचा विचार यासाठी केला जाणार आहे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती लवकरच दिली जाणार आहे. परीक्षा देण्याची संधी रिझल्टची घोषणा केल्यानंतर काही विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील तर त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी आयसीएसई बोर्ड देणार आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची ही परीक्षा होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3icaWdt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments