ICSI CSEET 2021: १० जुलैच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड

2021: कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया सेक्रेटरी ऑफ इंडिया, आयसीएसआयने १० जुलै रोजी होणाऱ्या सेक्रेटरी एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेसाठी (CSEET 2021) जाहीर केले आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट icsi.edu.येथे जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. ICSI CSEET प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी CSEET नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर थेट लिंकवर जावे लागेल. उमेदवार सीएसईईटी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून आयसीएसआय सीएसईईटी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. वैकल्पिकरित्या ते येथे दिलेल्या आयसीएसआय सीएसईईटी २०२१ परीक्षेच्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ICSI चे प्रवेश पत्र पोस्टाच्या माध्यमातून पाठवले जात नाही. हे केवळ ऑनलाईन माध्यमातून जारी केले जाते. CSEET, कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षांसाठी ICSI प्रवेश पत्र २०२१ खालील प्रकारे डाऊनलोड करा. सर्वात आधी पेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यावर सांगितल्या गेलेल्या स्टेप फॉलो केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. लॉगिन विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका तपशील टाकल्यानंतर 'लॉगिन' बटणावर क्लिक करा. आता स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र डाउनलोड करा. प्रवेश पत्रात काय असेल ? नाव नोंदणी क्रमांक परीक्षेचा टप्पा आपले नाव, पत्ता, कोड परीक्षा केंद्र परीक्षेचे माध्यम आणि मॉड्यूल परीक्षेची तारीख परीक्षेची वेळ मर्यादा उमेदवारांना निर्देश इथे लक्ष द्या प्रवेशपत्राचे उत्तम प्रिंटींग आणि क्वालिटीसाठी उमेदवारांनी गुगल क्रोम किंवा एक्सप्लोरर ८.० वापरण्याचे निर्देश आयसीएसआयने दिले आहेत. या परीक्षेची नोंदणी १५ जूनपर्यंत होती. जे विद्यार्थी १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा यंदा निकालाची वाट पाहत आहेत असे उमेदवार या परीक्षेस पात्र आहेत. आयसीएसआय २०२१ प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी माहिती काळजीपूर्वक वाचायला हवी. यामध्ये कोणती त्रुटी आढळल्यास संस्थेशी संपर्क साधावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ug7yUZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments