Also visit www.atgnews.com
UPSC NDA 1 Result 2021: यूपीएससी एनडीए १ चा निकाल जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC)घेण्यात आलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) 1 परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर येथे निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या आता मुलाखती घेण्यात येतील. जे उमेदवार पात्र ठरलेले नाहीत, ते NDA 2 साठी अर्ज करू शकतात. NDA 1 निकाल संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांचे नाव आणि रोल नंबर देण्यात आले आहेत. यानंतरचा टप्पा मुलाखतींचा आहे. पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे (SSB)मुलाखतींना बोलावले जाईल. NDA परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. जे उमेदवार पात्र ठरलेले नाहीत, ते NDA 2 साठी अर्ज करू शकतात. NDA ची दुसरी परीक्षा १४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. 2021: कसा पाहायचा निकाल? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट .gov.in वर जा. स्टेप २- ‘Written Result: National Defence Academy and Naval Academy Examination (I), 2021' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४- निकाल तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५- निकाल डाऊनलोड करा. स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा. (डायरेक्ट रिझल्ट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा) लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे (SSB)घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. अशा उमेदवारांना लेखी परीक्षेच्या निकालाच्या घोषणेच्या दोन आठवड्यांच्या आत भारतीय सैन्य भरती वेबसाइट joinindianarmy.nic.in वर आपले ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/364NveV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments