KVS Admission 2021 List:केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता पहिलीसाठी प्रवेश सुरु

KVS 2021 List:केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून (२३ जून २०२१) पहिली यादी (KVS Admission 2021 First List)जाहीर केली जात आहे. ड्रॉ संपल्यानंतर लगेचच KVSच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट अपलोड केली जाणार आहे. पालक पहिली यादी पाहण्यासाठी https://ift.tt/31GaKt9 वर क्लिक करु शकतात यानंतर यादी (KVS Admission 2021 First List) समोर येईल. वेगळ्या-वेगळ्या केंद्रीय विद्यालयांची यादी(Kendriya Vidyalaya) आपापल्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे.जागा रिकामी राहील्यास ३० जूनला दुसरी आणि ५ जुलैला तिसरी यादी (KVS (KVS Admission 2021 List) जाहीर करण्यात येईल. एसएमएस / ई-मेलच्या माध्यमातून शाळांमार्फत संबंधित अपडेट कळविली जाईल.अनारक्षित जागांसाठी प्राथमिकता सेवा श्रेणीनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी (KVS Admission 2021 List)ची घोषणा २ जुलै ते ६ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे. करोना प्रादुर्भावामुळे अनेकवेळा ड्रॉ रद्द करण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी आणि पालक आज पहिली प्रवेश यादी तपासू शकतात. KVS ने यादी जाहीर करण्यासाठी कोणती विशिष्ट वेळ निर्धारित केली नाही. काही क्षेत्रांमध्ये सकाळी ११ वाजता लॉटरीचे आयोजन केले आहे. यादी (KVS Admission 2021 List)दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिलीसाठी अधिसूचित क्षेत्र परिषद / नगर पालिका / नगर निगमकडून जन्म दाखला, सैन्य रुग्णालयातील जन्म दाखल्याचा तपशिल आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा तपशिल जन्म तारीख म्हणून प्रमाण मानला जाईल. दुसरीसाठी प्रवेश प्रक्रिया २५ जून ते ३० जून २०२१ पर्यंत आयोजित केली जाईल. KVS Admission २०२१ असे तपासा संबंधित KV वेबसाइटवर जा. होमपेज वर किंवा लॉगिन विभागांच्या खाली प्रकाशित यादीवर क्लिक करा. पुढील पेजवर आपल्या मुलांचे नावे तपासा केव्हीएस प्रवेश २०२१ साठी कागदपत्र विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि भरुन डाऊनलोड केलेला फॉर्म पडताळणीसाठी जन्म तारखेचे ओरिजनल प्रमाणपत्र एससी / एसटी / ओबीसी प्रमाणपत्र राहते ठिकाण बदलल्याचे प्रमाणपत्र (लागू होत असेल तर) या कागदपत्रांची झेरॉक्स जन्म तारखेचे प्रमाणपत्र निवासाचे प्रमाणपत्र सेवा प्रमाण (लागू असेल तर) नियुक्ती पत्र (लागू असेल तर) नवीन पगार स्लिप (लागू असेल तर) मुलांच्या नावावर जात प्रमाणपत्र (लागू असेल तर) मुलांचे विकलांगता प्रमाणपत्र (लागू असेल तर)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35L8W4B
via IFTTT

Post a Comment

0 Comments