Also visit www.atgnews.com
कोविड फ्री गावात सुरू होणार दहावी-बारावीच्या शाळा? मुख्यमंत्री म्हणाले...
school start in :करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाझार ग्रामपंचायतीने असा प्रयोग केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण विभागाला यासंदर्भात विचारणा केली. तसेच गावखेड्याच्या ठिकाणी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकतील का? यावर देखील शिक्षण विभाग विचार करत आहे. करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये विद्यार्थी शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकतात का ? यावर विचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. पण सध्या तरी ऑनलाइन शिक्षणासाठीच हे वर्ष असणार आहे. असे असताना ऑनलाइन शिक्षण किती विद्यार्थ्यांना शक्य आहे ? याचे सर्व्हेक्षण शिक्षण विभाग करत आहे. करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच करोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शिक्षण विभागाने करावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली होती. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रपोजल पाठवावे असे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी किती खर्च येईल ? हे नमूद करावे. कॅबिनेट मिटींगमध्ये याला संमती मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. करोनामुक्त गावात शाळा आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात सूचना केली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चु कडू यांना यासंबंधी पत्र देखील लिहिले आहे. त्यामध्ये गावात कशा पद्धतीने शाळा सुरू केली, राज्यात अन्यत्र शाळा सुरू करण्यासाठी काय करता येईल, याची सविस्तर माहिती त्यांनी या पत्रात दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतली असे दिसत आहे. त्यांनी म्हटले आहे, हिवरे बाजार या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे राज्यातील पहिले झाले. त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी,पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जूनपासून ५ ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ८ ते १० यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेली ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. हिवरे बाजार गाव १५ मे २०२१ रोजी करोनामुक्त झाले त्यात करोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करत होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35IxH1d
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments