MAH BA/BSc. BEd. CET 2021: बीए बीएड अभ्यासक्रमांच्या सीईटीची नोंदणी सुरू

MAH BA/BSc. BEd. CET 2021: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीए बीएड/ बीएस्सी बीएड अशा चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सीईटी'साठी (MAH-B.A./B.Sc. B.Ed.(Four Year Integrated Course)-CET 2021) ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या आठ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सीईटी सेलने या परीक्षेबाबतचे परिपत्रक वेबसाइटवर नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार परीक्षेसाठीची नोंदणी २५ जून ते आठ जुलै या कालावधीत करता येणार आहे. सीईटी सेलकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत नव्हते. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्याला सुरुवात झाली आहे. चार वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम असल्याने, त्याला प्रवेश घेण्य़ासाठी विद्यार्थी पसंती देतात. या परीक्षेला अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला ८०० रुपये शुल्क; तर राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क आहे. या सीईटीबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.gov वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची आणि परीक्षेची तारीख काही दिवसानंतर जाहीर करणार असल्याचे सेलकडून सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jl7xtH
via IFTTT

Post a Comment

0 Comments