Also visit www.atgnews.com
MCGM Recruitment 2021:पालिकेत बंपर भरती,३० हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार
MCGM Recruitment 2021:मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती आहे. पालिकेत २००० हून अधिक जागा रिक्त असून ३० हजाराहून २ लाखापर्यंत पगार मिळणार आहे. २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर पालिकेने स्टाफ नर्स, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ३ महिन्याच्या करारावर जम्बो कोविड सेंटरमध्ये ही भरती असणार आहे. पालिकेच्या वेबसाइटवर याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. पात्रता, पगार, रिक्त जागा, अर्ज करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख -२६ जून २०२१ एमसीजीएम रिक्त जागांचा तपशील स्टाफ नर्स - ९०० ते १००० जागा सहाय्य वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस - ९०० ते १००० जागा वरिष्ठ सल्लागार आणि इंटेन्सिव्हिस्ट (एमडी-मेडिसिन -१५ जागा) इंन्टेस्थेटिस्ट (एमडी -१० जागा) नेफ्रोलॉजिस्ट (डीएम -३ जागा) कार्डियोलॉजिस्ट (DM -१ जागा) न्यूरोलॉजिस्ट (डीएम -१) - ५० ते ७० पोस्ट पगार प्रशिक्षित स्टाफ नर्स - ३० हजार सहाय्यक वैद्यकीय अधिकारी - ८० हजार रुपये (एमबीबीएस), ६० हजार रुपये(बीएएमएस) आणि ५० हजार रुपये (बीएचएमएस) वरिष्ठ सल्लागार -एमडी उमेदवारांसाठी दीड लाख रुपये आणि डीएम उमेदवारांसाठी २.०० लाख रुपये स्टाफ नर्स, सहाय्यक एमओ आणि सल्लागार पदांसाठी पात्रता निकष शैक्षणिक पात्रता: वरिष्ठ सल्लागारपद- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सुपरस्पेशलिटी पदवी असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार एमएमसी (MMC) किंवा एमसीआय(MCI)कडे नोंदणीकृत असावा. सहाय्य वैद्यकीय अधिकारी- पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी धारक असावा. उमेदवार एमएमसी ( MMC) किंवा एमसीआय (MCI) किंवा संबंधित संस्थेत नोंदणीकृत असावा. प्रशिक्षित कर्मचारी परिचारिका - उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त नर्सिंग काऊन्सिलचा जीएनएम डिप्लोमा धारक असावा. महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलमध्ये उमेदवाराची नोंदणी असावी. वय मर्यादा: यामध्ये उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावा आणि ३३ वर्षांवर नसावे. अर्ज कसा करावा? अर्जाची प्रमाणपत्रे covid19mcgm@gmail.com किंवा stenodeanl@gmail.com वर ४ वाजेपर्यंत ईमेल करा. नवीन स्कॅन केलेल्या कागदपत्र २६ जून २०२१ पर्यंत पाठवावे लागतील. यानंतर आलेल्या कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qekRS4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments