NEET 2021: नीट परीक्षा कधी? प्रवेश परीक्षेवरील PIL फेटाळली

NEET 2021:नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) 2021 परीक्षा स्थगित करण्याच्या प्रकरणी दाखल याचिक कर्नाटक हायकोर्टाने फेटाळली आहे. ३१ ऑगस्टनंतर नीट 2021 परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकी कर्नाटक हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने सांगितलं, केंद्र आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर घेतलेला निर्णय योग्य आहे, तो बदलला जाऊ शकत नाही. न्या. बीवी नागरत्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, केंद्र सरकारच्या ३१ ऑगस्ट नंतर परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयाला अयोग्य ठरवलं जाऊ शकत नाही. कारण हा निर्णय तज्ज्ञांचा सल्ला आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांच्या आधारे घेण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? नीट 2021 चे आयोजन १८ एप्रिल रोजी होणार होती, लेकिन करोना व्हायरस (COVID19)च्या दुसऱ्या लाटेदरम्यान परीक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, या वेळी परीक्षेचे आयोजन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित नाही. म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. पीआयएल (PIL) मध्ये मागणी केली गेली आहे की परीक्षा ३१ ऑगस्टनंतरपर्यंत टाळणे योग्य नाही. यामुळे उमेदवारांवरील ताण वाढत चालला आहे. नीट परीक्षेसंबंधी काय होती मागणी? याचिकाकर्ता डॉ विनोद के मुताबिक, नीट-2021 चे आयोजन १८ एप्रिल रोजी होणार होते, मात्र ती स्थगित झाल्यानंतर पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करणाऱ्या इच्छुक डॉक्टरांना तणावाला सामोरे जावे लागत आहे. याचिकाकर्त्यांनी असा दावा केला होता की जेव्हा महामारीदरम्यान अन्य सर्व परीक्षांचे आयोजन केले जात होते, तेव्हा नीट स्थगित करण्याचे कुठले कारणच नव्हते. कोण आहेत डॉ. विनोद कुलकर्णी? याचिका जी बी कुलकर्णी मेमोरियल लीगल ट्रस्ट द्वारा दाखल करण्यात आली आहे, याचे अध्यक्ष डॉ विनोद कुलकर्णी प्रतिनिधित्व करत आहे. डॉ. विनोद एक न्यूरो सायकेट्रिस्ट कन्सलटंट, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी ८ मे रोजी ही जनहित याचिका दाखल केली होती. Exam Date कधी? यापूर्वी, केंद्राने मे महिन्यात नीट प्रवेश परीक्षा प्रलंबित करताना सांगितले होते की ३१ ऑगस्टपूर्वी परीक्षा आयोजित केली जाणार नाही. प्रधानमंत्री कार्यालय (PMO) ने म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना तयारीसाठी किमान एक महिन्याचा अवधी दिला जाईल. दरम्यान, शिक्षण मंत्रालय COVID स्थिती चा आढावा घेतल्यानंतर परीक्षेबाबतचा निर्णय घेईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35yuIZk
via IFTTT

Post a Comment

0 Comments