National Reading Day 2021:शाळांमध्ये सुरु होणार राष्ट्रीय वाचन दिन

National : सीबीएसईच्या शाळांमध्ये दरवर्षी राष्ट्रीय वाचन महिना साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये १९ जूनपासून याची सुरुवात होणार आहे. मुलांची शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी हा या अभियानामागचा उद्देश आहे. सध्याची परिस्थिती पाहता डिजीटल वाचनालयाचे महत्वा वाढले आहे. हे अभियान १८ जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. हा दिवस केरळचे पुस्तक आंदोलनाचे जनक पीएन पैनिकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हा दिवस साजरा केला जातो. पैनिकर यांचा जन्म १ मार्च १९०९ रोजी झाला होता. ते एक शिक्षक होते. त्यांचा समाजावर खूप प्रभाव होता. या वर्षांत १९४५ मध्ये ४७ ग्रामीण ग्रंथालयांसोबत तीरुविथाकूर ग्रंथशाळा स्थापना मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. वाचा आणि पुढे जा ही या संघटनेची टॅग लाईन आहे. केरळ राज्य बनल्यानंतर याचे नाव केरळ ग्रंथशाला संघम असे ठेवण्यात आले. प्रत्येक गावात यात्रा करुन त्यांनी लोकांना वाचण्याचे महत्व समजवाले. अशाप्रकारे ते आपल्या नेटवर्कमध्ये ६ हजार ग्रंथालयाशी जोडण्यात ते यशस्वी झाले. १९७५ मध्ये ग्रंथालयाला कृपसकय पुरस्काराने सन्मानित केले गेले. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xqAfgg
via IFTTT

Post a Comment

0 Comments