बारावी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; NBE मध्ये भरती

NBEMS Recruitment 2021: राष्ट्रीय परीक्षा बोर्डात सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयांतर्गत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्स (NBEMS)म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा बोर्ड ()ने ७ व्या सीपीएसच्या पे-मॅट्रिक्स लेवल २, ४ आणि ७ वर विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार, सीनियर असिस्टंटच्या ८ पदे, ज्युनियर असिस्टंट ३० पदे ज्युनियर अकाउंटंटच्या ४ पदांवर भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवारांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाइट वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जुलै २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि उमेदवार १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्जासोबत उमेदवारांना अर्ज शुल्क १५०० रुपये आणि १८ % जीएसटी भरावे लागेल. मात्र, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात पूर्ण सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा सीनियर असिस्टंट – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. वयोमर्यादा २७ वर्षे. ज्युनियर असिस्टंट – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर व बेसिक सॉफ्टवेयर पॅकेजमध्ये प्रोफिशिएंसी. वयोमर्यादा २७ वर्षे. ज्युनियर अकाउंटंट – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून गणित किंवा स्टॅटेस्टिक्समध्ये पदवी किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट्स. वयोमर्यादा २७ वर्षे. कमाल वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सवलतही दिली जाईल. एससी/एसटीसाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्ष, दिव्यांग (अनारिक्षत) साठी १० वर्षे, दिव्यांग (ओबीसी) साठी १३ वर्षे, दिव्यांग (एससी/एसटी) साठी १५ वर्षे सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड दोन टप्प्यातील प्रक्रियेद्वारे केली जाईल आणि मुलाखतीचा टप्पा यात नाही. पहिल्या टप्प्यात संगणकीकृत परीक्षा (सीबीटी) आयोजित केली जाईल. यात २०० प्रश्न असतील आणि एकूण २०० गुण असतील. परीक्षेचा कालावधी १८० मिनिटांचा असेल. परीक्षेत नकारात्मक गुणांकन देखील आहेत. ०.२५ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तराला वजा होतील.दुसऱ्या टप्प्यात कॉम्प्युटर नॉलेज आणि स्किल टेस्टचे आयोजन केले जाईल. ही परीक्षा १०० गुणांची असेल आणि ७५ मिनिटांचा कालावधी असेल. अंतिम निवड दोन्ही टप्प्यातील गुणांच्या आधारे गुणवत्तेवर होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iOJqTG
via IFTTT

Post a Comment

0 Comments