ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काहीपण! अवघ्या १५ दिवसात शासन निर्णय जाहीर

:ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्यात वसतीगृह उभारण्यासंदर्भात २ जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत योजनेला मंजुरी देण्यात आली होती. आणि आता १५ दिवसांमध्ये त्यासंदर्भातआदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची वाट मोकळी झाली आहे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडक 10 तालुक्यात 20 वसतिगृह उभारणे, पदभरती, इमारत उपलब्धी आदी बाबींना मंजुरी देणारा शासन निर्णय झाल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलू शकल्याचा मनस्वी आनंद असल्याचे ट्वीट त्यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह मिळावे यासंदर्भात २ जूनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर १५ दिवसात योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. अशी असेल योजनेची व्याप्ती संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले ४१ तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात १०० विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतिगृहे असे एकूण ८२ वसतीगृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १० तालुक्यातील २० वसतीगृहांना मंजुरी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले १० तालुके निवडून त्यामध्ये मुला-मुलींसाठी २ असे एकूण २० वसतीगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही २० वसतीगृहे या शैक्षणिक वर्षातच सुरू करावेत. या वसतिगृहाच्या इमारतीचे निर्माण होईपर्यंत भाड्याच्या इमारती मध्ये वसतीगृह सुरू करावेत असेही या निर्णयात नमूद करण्यात आले असून, यासाठी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवान बाबा यांच्या नावाने वसतीगृह योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज ही योजना प्रत्यक्षात उतरवली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iKsa29
via IFTTT

Post a Comment

0 Comments